पोषण आहारातील फोर्टिफाईड तांदूळ आरोग्य वर्धकच

पोषण आहारातील फोर्टिफाईड तांदूळ आरोग्य वर्धकच

भंडारा, दि.01:- 03 ते 06 वयोगटातील बालकांना पूरविण्यात आलेल्या आहारातील तांदूळात प्लास्टिक तांदूळ मिश्रीत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली मात्र तो प्लॉस्टिक तांदूळ नसून आरोग्यवर्धक फोर्टिफाईड तांदूळ आहे. याबाबत महिला व बाल कल्याण विभागाने संबंधिताचे शंका निरसन सुध्दा केले आहे. याबाबत गैरसमज करण्यात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 6 महिने 6 वर्ष वयोगटातील बालके व गरोदर स्तनदा माता यांना गहू, तांदूळाचे नियतन केले जाते. माहे जून अखेर पर्यंत सर्वसाधारण तांदूळाचे वाटप केले जात होते. परंतु केंद्रशासनाच्या पत्रानुसार प्रथमच फोर्टिफाईड तांदूळाचे नियतण मंजूर करण्यात आले आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य कन्फ्यूमर फेडरेशनला माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीकरीता फोर्टिफाईड तांदूळाचे नियंतण मंजूर करण्यात आले आहे व त्यानुसार महाराष्ट्र राज्य कन्फ्यूमर फेडरेशण व एफसीआय गोडावून मध्ये फोर्टिफाईड तांदूळाची उचल केली असून त्याप्रमाणे अंगणवाडीस्तरावर वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळाचे वितरण करतील. सद्या पुरवठा करण्यात आलेल्या / येणाऱ्या तांदूळामध्ये काही प्रमाणात तांदूळ फोर्टिफाईड आहे. हा तांदूळ नियमित तांदूळापेक्षा थोडासा पिवळसर आहे. त्यामुळे पालकांच्या मनामध्ये उक्त तांदुळाबद्दल अधिकची माहिती खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 केंद्र शासनाकडून वर्ष सन 2021-22 (जूलै 2021 पासून) योजने अंतर्गत फोर्टिफाईड तांदूळ प्रथमच पुरवठा केला जात आहे. पुरवठा करण्यात येणाऱ्या फोर्टिफाईड तांदूळ व नियमित तांदूळ यांचे प्रमाण 1:100 आहे. म्हणजेच पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदूळामध्ये फोर्टिफाईड तांदूळाचे प्रमाण 1 किलो मध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात आहे.

लाभार्थ्यांच्या आहारामधील सूक्ष्म पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्याकरीता फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येत आहे. तांदूळामध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटामिन 312 तसेच झिंक व्हिटामिन ए, व्हिटामिन बी1, बी2, बी5, बी6 या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनविण्यात आलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने उक्त तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. प्रक्रिया करण्यात आलेल्या फोर्टिफाईड तांदूळाचे वजन हे नियमीत तांदूळापेक्षा कमी असते. त्यामुळे सदरचा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसून येतो. योजनेंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळापैकी काही तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करण्यात येऊ नये. फोर्टिफाईड तांदूळ नियमित पध्दतीने शिजवण्यात यावा याकरीता कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपध्दती अवलंबविण्याची आवश्यकता नाही.

फोर्टिफाईड तांदूळाबाबत अधिकची माहिती जाणून घ्यावयाची असल्यास केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी अॅन्ड स्टॅन्डर्ड ऑफ इंडिया (एफएसएसएआय) संकेतस्थळावर उपलब्ध असून उक्त माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. https://ffro.fssai.gov.in/commodity योजनेंतर्गत पुरवठा करण्यात येणारा फोर्टिफाईड तांदूळ हा अधिक पोषकमूल्य असलेला गुणवत्तापूर्ण तांदूळ आहे. त्यामुळे उक्त तांदूळाबाबत गैरसमज करण्यात येऊ नये, असे जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे