स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करीता दिव्यांगांना अर्ज करण्याचे आवाहन

स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करीता दिव्यांगांना अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.29 सप्टेंबर : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पीठ गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, संगणक व प्रिंटर इत्यादीसाठी अर्थसहाय्य तसेच दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय इत्यादी व्यवसायासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.

दिव्यांग शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता, शेतीविषयक अवजारे, मोटर पंप, विहीर खोदणे, गाळ काढणे, पाईप लाईन, मळणी यंत्र, ठिबक सिंचन तसेच बी-बियाण्यांसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. तरी इच्छुक दिव्यांग लाभार्थ्यांनी पंचायत समितीमार्फत अर्ज सादर करावे. असे आवाहन  जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी केले आहे.