मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेतंर्गत शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करावे

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेतंर्गत शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करावे

चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे सन 2021-22 या सत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रस्ताव स्वीकारणे सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, मान्यताप्राप्त शाळेतील मुख्याध्यापकांनी सदर शिष्यवृत्तीचे प्रस्ताव दि. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत कार्यालयामध्ये दिलेल्या प्रपत्रामध्ये सादर करावे.
सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव दिलेल्या कालावधीत सादर करावेत. कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी केले आहे.