निवडणुक कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार

निवडणुक कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार

           भंडारा, दि.10 : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-4 अ दिनांक 05 एप्रिल,2024 अन्वये फौजदारी प्रक्रिया सहिता, 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले फीरते पथक एफएसटी आणि स्थायी  निगराणी पथक एसएसटी या क्षेत्रिय अधिका-यांना दिनांक 12 एप्रिल,2024 पासून सांयकाळी 06 वाजेपासून ते दिनांक 19 एप्रिल,2024 पर्यत या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून फौजदारी प्रक्रिया सहिता,1973 च्या कलम 129, 133, 143,व 144 नुसार शक्ती प्रदान करीत असल्याची अधिसूचना निर्गमीत केले आहे.यानुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे,असे आवाहन अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी,भंडारा यांनी कळविले आहे.