लोकशाही दिनात 15 दिवस आधी अर्ज सादर करावा

लोकशाही दिनात 15 दिवस आधी अर्ज सादर करावा

भंडारा, दि. 8 : शासन परिपत्रक दिनांक 26 सप्टेंबर 2012 अन्वये जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पहिल्या सोमवारी व तालुका स्तरावर तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. ज्यांना लोकशाही दिनात अर्ज सादर करावयाचा आहे, त्यांनी प्रथम प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करावा. तालुकास्तरीय लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करावा. तालुका व जिल्हास्तरावर लोकशाही दिनात अर्ज 15 दिवस आधी दोन प्रतीमध्ये स्विकारण्यात येतील, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.

लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील प्रकरणे, सेवा विषयक, आस्थापना विषयक, सामुहिक कामासंबंधित तसेच तालुका लोकशाही दिनी सादर न केलेल्या तक्रारी व अर्ज स्विकारले जाणार नाही. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.