नुसते खोके आणि जाहिराती कधी होणार पद भरती

नुसते खोके आणि जाहिराती कधी होणार पद भरती

बेरोजगारी,पेपरफुटी, पदभरती प्रश्नावर विरोधक आक्रमक

विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने

मविआचे विधिमंडळ परिसरात मोर्चा काढून आंदोलन

नागपूर, १४
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधक राज्यातील वाढती बेरोजगारी , पेपरफुटी, पदभरती प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत”नुसत्या घोषणा आणि जाहिराती कधी होणार पद भरती” ” सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी” म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर वडे तळत बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारविरोधात
‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले, भरतीची घोषणा, काय दिवे लावले. उच्चशिक्षित तरुणांची थट्टा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बेरोजगारांना पकोडे तळा म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे,बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे.अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.

नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले.

“एक दिवा खोक्यानी दुसरा दिवा धोक्यानी””नुसत्या घोषणा आणि जाहिराती कधी होणार पद भरती” ” सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी”” का होतेय पेपरफुटी क्या यही है मोदी की गॅरंटी?” ” सरकारनं दिला युवकांना धोका म्हणून काढलाय भरतीचा ठेका” अशा विविध घोषणा लिहिलेले काळे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.