आयटीआय मध्ये शिकाऊ उमेदवारांचा भरती मेळाव्याचे आयोजन

आयटीआय मध्ये शिकाऊ उमेदवारांचा भरती मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 सप्टेंबर: कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. चंद्रपूर येथे  दि. 4 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारांच्या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची निवड कंपनी आस्थापना करणार आहे.
तरी, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित राहावे. असे आवाहन आयटीआयचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती प्र. दहाटे यांनी केले आहे.