रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम

रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम

          भंडारा,दि.26 :जिल्ह्यामध्ये भटके कुत्रे व इतर पाळीव श्वान यांची संख्या   अधिक आहे. पाळीव कुत्रे, यांना त्यांचे मालका मार्फत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते तसेच वेळोवेळी आवश्यक ती काळजी घेतली जाते. परंतु गावठी कुत्रे हे बेवारस पणे जगतात किंवा त्यांना कुणी पाळले तरी त्यांची विशेष काळजी घेतली जात नाही. आणि चुकीने चावा घेतला किंवा कुत्र्याला रोग झाला असता चावा घेतल्याने रेबीजचा धोका संभवतो.करीता जागतिक रेबीज दिवसाचे औचित्य साधून रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात रेबीज लस टोचून दिली जाईल यासाठी श्वान मालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.