माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करावे

माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करावे

भंडारा,दि.27:- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक तसेच त्यांच्या विधवांना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये बारावी, पदवीका तसेच पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण होवून वर्ष 2021-22 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी.डी.एस, बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एस.सी, (बायोटेक), एम.एस.सी, नर्सिंग, बी फॉर्म व इतर व्यावसायिक शिक्षण घेत आहेत त्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड दिल्ली यांचे कडून पंतप्रधान शिष्यवृत्ती देण्यात येते.
या योजनेस पात्र माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी केंद्रीय सैनिक बोर्ड दिल्ली यांच्या संकेतस्थळावर www.ksb.gov.in वर फॉर्म भरुन सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कार्यालय भंडारा येथे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.