ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत होणाऱ्या खर्चाच्या ट्रू वोटर ॲपचा वापर करुन निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करा

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत होणाऱ्या खर्चाच्या
ट्रू वोटर ॲपचा वापर करुन निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करा

गडचिरोली,दि.01: राज्य निवडणूक आयोगाने दि. 03 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक/ पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निवडणुकीचे निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावयाचा आहे. सदर निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात येत आहे. यासाठी गुगल/ ॲपल प्लेस्टोअर वरुन ट्रू वोटर ॲप डाऊनलोड करुन त्याद्वारे खर्चाचा हिशोब सादर करावा.
ट्रू वोटर ॲप बाबतीत काही तांत्रिक अडचणी असल्यास 7767008612, 7767008613 व 7767008614 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे उप सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी कळविले आहे.