स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत कुक्कुटपालन प्रशिक्षण

स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत कुक्कुटपालन प्रशिक्षण

भंडारा,दि.24:- बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांचे मार्फत कुक्कुटपालन विषयीचे 10 दिवसीय मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 28 सप्टेंबर 2021 पासून करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात कोंबड्या, कोंबड्यांचे प्रकार, शेड बांधकाम, लसीकरण, औषधोपचार, कडकनाथ, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसाय संधी, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना तसेच वित्तीय योजनांची माहिती दिली जाईल.
सदर प्रशिक्षण फक्त भंडारा जिल्ह्यातील रहिवासीयांसाठी आहे. प्रशिक्षण प्रवेशाकरीता आयोजित मुलाखतीकरीता येताना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशन कार्ड, आधार कार्ड व 4 फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवण, चहा, नाश्ता, वह्या – पुस्तके, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल.
स्वयंरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी, वय 18 ते 45 वर्षे, शिक्षण 10 वी पास किवा नापास अशा बेरोजगार पुरुष व महिलांनी मुलाखतीकरीता 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला, साखरकर सभागृह समोर, महाबोधी बुद्धविहाराच्या समोर शास्त्री चौक भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था संचालक एस.डी.बोदेले यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता मोबाईल नंबर 9511875908 किंवा 8669028433 वर संपर्क करावा.