पालकमंत्री विजय वडेट्टीवार नियोजनबद्ध विकास दृष्टीने ब्रम्हपुरी येथे साकारलेले ब्रम्हपुरी गारमेंट क्लस्टर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार नियोजनबद्ध विकास दृष्टीने ब्रम्हपुरी येथे साकारलेले ब्रम्हपुरी गारमेंट क्लस्टर

भविष्यात ‘मेड इन ब्रह्मपुरी’ चे वस्त्र जगात जाऊन ब्रह्मपुरीकरांची मान अभिमानाने उंचावल्या जाईल. ब्रम्हपुरी येथे अद्यावत तयार कपडे निर्मिती करुन ते विविध मेट्रो शहरातील प्रमुख बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. गारमेंट शिलाईचा हा प्रकल्प जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील महत्त्वपूर्ण एकमेव प्रकल्प आहे. येथे सर्व प्रकारचे कपडे तयार होणार असून हा प्रकल्प पुढील कालावधीत पाच एकर मध्ये विस्तारित होणार आहे. विकासाबरोबर युवतींच्या हाताला काम मिळवून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून ब्रह्मपुरी विभागात पुढील दोन वर्षात किमान दोन हजार रोजगार मिळेल
कौशल्य विकासातून महिलांना रोजगारचा हा उपक्रम कौशल्य विकास विभागातर्फे सुरू करण्यात आला आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम विदर्भात सर्वात पहिले ब्रम्हपुरी येथे सुरू करण्यात आले आहे.