“स्वच्छ निळ्या आकाशासाठी; स्वच्छ हवा” आंतरराष्ट्रीय दिवस

“स्वच्छ निळ्या आकाशासाठी; स्वच्छ हवा” आंतरराष्ट्रीय दिवस

चंद्रपूर, ता. १२ : चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरअंतर्गत “स्वच्छ निळ्या आकाशासाठी; स्वच्छ हवा” आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र वायू प्रदूषण नियंत्रक बोर्डाच्या पत्रांन्वये दिनांक 7 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आंतराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. या अंतर्गत दिनांक 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत शहरातील वाढते वायू प्रदूषण थांबविण्यासाठी तथा लोकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिकाअंतर्गत शहरात ठिठिकाणी अनेक कार्यक्रम करण्यात आले. यामध्ये निर्मल नगर तुकुम, इंडस्ट्रीयल एरिया, अयोध्या चौक इंदिरा नगर, क्रीष्णा नगर, संजय नगर चौक, श्याम नगर इत्यादी ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्यात आला. 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत शहरात  स्वच्छ हवेचे प्रमाण वाढावे, स्थानिक परिसरात होणारे वायुप्रदूषण थांबावे यासाठी स्थानिक परिसरातील जनतेसोबत चर्चा करण्यात आली. यामध्ये लोकांना शहरात वाढत्या वायू प्रदूषणाचे धोके टाळण्यासाठी, वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करावयास हवी, याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रमात 574 लोकांनी सहभाग नोंदविला.
“करावया आरोग्याचे रक्षण, तर थांबवाया हवे वायू प्रदूषण”  या उक्तीचे समर्थन करत स्थानिक लोकांनी कार्यक्रमात उस्फुर्त सहभाग घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. भविष्यात स्वच्छ चंद्रपूरचे ज्याप्रमाणे स्वप्न साकार झाले त्याचप्रमाणे स्वच्छ हवा शहर म्हणून चंद्रपूर शहराचे नावलौकिक होईल, या दिशेने जनतेने प्रयत्न करण्याचे ठरविले.