सैनिक विधवांच्या अडचणीबाबत सभा

सैनिक विधवांच्या अडचणीबाबत सभा

 

भंडारा, दि. 13 : जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवांच्या अडचणी व समस्याबाबत येत्या शुक्रवार 16 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक/विधवांच्या काही समस्या असल्यास लेखी स्वरूपात उद्या दि. 14 जूनपर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाने केले आहे.