जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

          भंडारा,दि. 9 : जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रांस मध्ये ल्योन येथे होणार असून याकरिता जिल्हा विभाग,राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत.ही स्पर्धा दर दोन वर्षानी होते.आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे.

          या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने भंडारा जिल्हयातील युवक व युवतीनी विविध 52 क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी महास्वयंम वेबपोर्टलवर करावी,असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त,सुधाकर झळके,यांनी केले आहे.

     यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधुन 50 देशातील 1 हजार उमदेवार समाविष्ट असून या स्पर्धा 15 देशात 12 आठवडयासाठी आयोजित करण्यात आली होती.यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रांन्स ल्योन येथे आयोजित होणार आहे.जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे.

        या स्पर्धेमध्येस हभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी,2002 किंवा तद्नंतरचा असावा,तसेच आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंक क्लाऊड कंप्युटींग,सायबर सिक्युरिटी,डिजिटल कन्स्ट्रकशन,इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी,इंडस्ट्री 4.0 इन्फॅारमेशन नेटवर्क केबलिंग,मेकॅट्रनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी,1999 किंवा त्या नंतरचा असणे अनिवार्य आहे.

     फ्रान्स ल्योन येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी जिल्हा,विभाग,राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न,कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या द्ष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,एमएसएमई टूल रुम्स,सिपेट आयआयटी,आभियात्रिकी महाविद्यालये,तंत्रनिकेतन महाविद्यालये,आयएचएम हॉस्पिटेलिटी इंस्टिटयूट,कॉर्पोरेट टेक्निकल इंस्टीटयूट ,स्किल ट्रेनिंग इंस्टीटयूट,महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ,एमएसबीव्हीटी,खाजगी शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये,तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य  विकास सोसायटीकडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था,विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांचेकडील विहीत वयोमर्यादेतील इच्छुक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धासाठी करता येईल.

     तसेच या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य  विकास सोसायटी,मुंबई यांचेकडून करण्यात यासाठी सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी https/kaushlya.mahaswyam,gov.in या लींकवर भेट देऊन नोंदणी करून 20 नोव्हेंबरपूर्वी आपला सहभाग निश्चीत करावा.असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,विभाग यांनी कळविले आहे.