सोशल मीडियावर पत्रकारांचे बदनामी करणाऱ्या वर कार्यवाही करा… गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाची मागणी ..पोलिसात तक्रार

सोशल मीडियावर पत्रकारांचे बदनामी करणाऱ्या वर कार्यवाही करा…
गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाची मागणी ..पोलिसात तक्रार
गोंडपिपरी…
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेल्या पत्रकार बद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक लिखाण करणाऱ्या गोंडपिपरी येथील सचिन चौधरी यांच्याविरुद्ध गोंडपिपरी तालुका पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ठाणेदार जीवन राजगुरू यांना तक्रार देण्यात आली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिल्या जाते. समाजातील घडणाऱ्या घडामोडी, नागरिकांच्या समस्या शासन-प्रशासन कडे पोहोचवण्याचे काम पत्रकार करीत असतो. कोरूना काळात पत्रकार यांनी महत्त्वाची भूमिका कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत सामाजिक प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून मार्गी लावलेत.यात कोरोना ची लागण होऊन अनेक पत्रकारांना आपला जीव सुध्धा गमवावा लागला. शासन स्तरावर कुठलेही मानधन न घेता निःशुल्क सेवा देण्याचे काम पत्रकार करत आहे.मात्र काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकाकडून अलीकडे पत्रकारांवर हल्ले,धमकी येण्याचे प्रमाण वाढले असताना काल दिनांक ०४/०९/२०२१ ला गोंडपिपरी येथील सचिन चौधरी यांनी येथील गोंडपिपरी शेर या व्हाट्सअप ग्रुप वरती रात्री ०८:११ वाजता पत्रकारांना बदनामी करणारे लिखाण केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आकाश चौधरी यांनी वैफल्यातून काल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.त्यावर देखील त्याच्या मृत्यूला पत्रकार कारणीभूत आहेत असा घणाघाती बिनबुडाचा आरोप करून समस्त पत्रकारांच्या भावना दुखावल्या.यापूर्वी देखील सोशल मीडियावर पत्रकार बद्दल अनेक आक्षेपार्ह विधान केले आहेत. सदर लिखाण करणारा हा गुंड प्रवृत्ती चा असून यापूर्वी गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असून पत्रकारांवर बदनामीकारक लिखाण केल्या प्रकरणी सायबर गुन्हा अंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी.अशी तक्रार गोंडपिपरी तालुका पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गोंडपिपरी यांच्यावतीने गोंडपिपरी चे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्याकडे देण्यात आली.