कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा भव्य रोजगार मेळावा एमआयईटी शहापूर येथे संपन्न्‍ा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा

भव्य रोजगार मेळावा एमआयईटी शहापूर येथे संपन्न्‍ा

 

भंडारा, दि. 16 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांची व मुलींची व मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर (MIET) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर (MIET) याठिकाणी आयोजीत करण्यात आलेले होते.

 

सदर रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ज.मु. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उमेश खारोडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा चे सहायक आयुक्त सुधाकर झळके, मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर चे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे, आयटीआय भंडाराचे प्राचार्या श्रीमती जयश्री निंबार्ते, श्री. शाहीद शेख एमआयटी शहापूर उपस्थित होते.

 

यावेळी मार्गदर्शन करतांनी डॉ. विकास ढोमणे प्राचार्य ज. मु. पटेल महाविद्यालय भंडारा यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. तर सुधाकर झळके सहायक आयुक्त यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्‍यमातून जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेवून आपल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करावे असे मार्गदर्शन केले. श्री. उमेश खारोडे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी भंडारा यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जिवनकार्याचा उलघडा करुन त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. श्रीमती जयश्री निंबार्ते प्राचार्य आयटीआय भंडारा यांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रल्हाद हरडे, प्राचार्य मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर यांनी आजचे युग हे कौशल्याचे युग असून ज्यांच्याकडे कौशल्य असेल त्यांना रोजगार हमखास मिळेल व त्यासाठी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर हे उमेदवारांना नेहमीच विविध संधी उपलब्ध करुन देत असते असे मार्गदर्शन केले.

 

सदर रोजगार मेळाव्यामध्ये स्थानिक जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील नामाकिंत १९ कंपन्यानी त्यांच्याकडील 1100 पेक्षा जास्त पदासाठी मुलाखती घेतल्या व याच दिवशी ४८० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष १७२५ उमेदवार उपस्थित होते आणि त्यांचे तज्ञ मार्गदर्शकाद्वारे उमेदवारांना समुपदेशन करण्यात आले. तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या उमेदवारांकरीता जिल्हा उद्योग केंद्र भंडारा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, जिल्हा अग्रणी बँक,स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊसाठे विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या स्टॉलच्या माध्यमातून २४५ उमेदवारांनी लाभ घेतला.

 

सदर रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता श्री. एस. के. सय्यद, वरिष्ठ लपीक तथा नोडल ऑॅफीसर, श्री. सोनु उके जिल्हा समन्वयक, श्री. कावडे गट निदेशक, श्री. सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, श्रीमती प्रिया माकोडे वरिष्ठ लिपीक, मीरा मांजरेकर एमजीएनएफ, श्रीमती आशा वालदे वरिष्ठ लिपीक, श्री. आडे बीटीआरआय भंडारा, श्री. शाहीद शेख एमआयटी शहापूर श्री. डोंगरे आयटीआय मुलांची भंडारा श्री. जिभकाटे आयटीआय मुलांची भंडारा श्री. गायधने आयटीआय मुलांची भंडारा, श्री. अंकुश कापगते आयटीआय मुलींची भंडारा श्री. साठवणे, आयटीआय मुलांची भंडारा तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांची व मुलींची भंडारा व मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच एनएसएस चे स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.