27 डिसेंबरला बामणी फाटा ते बंगाली कॅम्प मार्ग जड वाहतुकीसाठी बंद

27 डिसेंबरला बामणी फाटा ते बंगाली कॅम्प मार्ग जड वाहतुकीसाठी बंद

चंद्रपूर, दि. 25 : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा बल्लारपुर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या असून 27 डिसेंबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी देशभरातून सहभागी शालेय विद्यार्थी-खेळाडूंची चंद्रपूर ते क्रीडा संकुल विसापूर या मार्गावर रहदारी राहणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता असलेल्या मार्गावरील वाहतूक विनाअडथळा सुरळीत चालावी व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून 27 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बामणी फाटा, बल्लारपूर ते बंगाली कॅम्प चौक, या मार्गावरील जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, अशा असे आवाहन त्यांनी केले आहे.

यादरम्यान जड वाहतुकदारांनी वरोरा, भद्रावती व चंद्रपुरकडून गडचांदुर किंवा राजुरा जाण्यासाठी पडोली-धानोरा फाटा-भोयगांव रोड या मार्गाचा अवलंब करावा. गडचांदुर व राजुराकडुन वरोरा, भद्रावती व चंद्रपुर येण्यासाठी भोयगांव-धानोरा फाटा-पडोली या मार्गाचा तसेच गोंडपिपरी व कोठारीकडुन चंद्रपुर किंवा मूल जाण्यासाठी येनबोडी-पोंभुर्णा मार्गाचा आणि चंद्रपूर व मुल कडून बल्लारशा, गोंडपिपर, राजुरा जाण्यासाठी पोंभुर्णा-येनबोडी मार्गाचा अवलंब करावा, असेही आदेशात नमुद आहे.