स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणि सुरू होणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवच्या निमित्ताने आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा- तळोधी (बा.) तर्फे दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी पोलीस स्टेशन तळोधी येथील ठाणेदार रविंद्र खैरकर , पोलिस उपनिरीक्षक  साखरे तसेच तळोधी नगरातील माझी सैनिक खोजरामजी मरस्कोले, गंगाधरजी पाकमोडे व दिलीपजी नान्हे यांचा ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतिय विद्यार्थी परिषद चे जिल्हा संयोजक प्रविण गिरडकर, आकाश बांगरे, वैभव जीभकाटे उपस्थित होते.