पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 18 सप्टेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 11 वाजता अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, चंद्रपूर येथे पांदन रस्त्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या  व प्रस्तावित कामांबाबत आढावा बैठक. दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात घरकुल कामांबाबत आढावा बैठक. सोयीनुसार हिराई विश्रामगृह,ऊर्जानगर चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि. 21 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.