अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे “एक गाव, एक तिरंगा” महाअभियान.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे “एक गाव, एक तिरंगा” महाअभियान.

१५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपले बलिदान दिले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष पूर्ण होऊन या १५ ऑगस्ट पासून आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत या निमित्ताने अभाविप १५ ऑगस्ट २०२१ रोजी देशभरातील १ लाख २८ हजार ३३५ गावांमध्ये तिरंगा फडकवणार आहे. तसेच अकोला जिल्हा म्हणून एकुण ८० ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करीत आहे. या अनुषंगाने एक गाव-एक कार्यकर्ता-एक तिरंगा या अभियानाचे दि. १५ ऑगस्ट २०२१ ला आयोजन केले आहे. या अभियानात आपण आपल्या कुटुंबासह नक्की सहभागी व्हावे असे आव्हान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे. आपल्या घरात / गल्लीत / चाळीत / सोसायटी / अपार्टमेंट / गणपती मंडळ, मित्र मंडळ / रिक्षा युनियन / सामाजिक संस्था / इतर संघटनांद्वारे आपल्या ठिकाणी ध्वज वंदन, भारतमाता पूजन करून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाची सुरवात उत्साहात करूया. आपल्या ठिकाणी ध्वज वंदन करण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते आपल्याला मदत करतील.
अभाविप सर्व देशवासियांना या मोहिमेचा एक भाग बनण्याचे आवाहन करते, जेणेकरून स्वातंत्र्यासाठी असंख्य संघर्षांची ऊर्जा, असंख्य त्याग आणि असंख्य तपस्या भारतभर एकाच वेळी पुन्हा जागृत होईल.
ज्ञान , शील एकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गेली ७२ वर्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अविरत पणे काम करणारी दरवर्षी लाखोंच्या संख्येने सदस्यता नोंदवणारी अभाविप ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना झाली आहे . आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे . छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती या विचारधारेतून आणि शैक्षणिक परिवार या संकल्पनेवर दृढ विश्वास ठेवून सामाजिक व राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी , चर्चा आणि आंदोलन यांच्या माध्यमातून अभाविप सतत कार्यरत असते शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधातील धडक मोर्चा , संघर्ष यात्रा , शैक्षणिक समस्यांची काळी पत्रिका अश्या विविध माध्यमातून शैक्षणिक समस्या सोडविण्याचे काम अभाविपने केले आहे . त्याच बरोबर देशाच्या राष्ट्रीय संरक्षण विषयातही अभाविप नेहमीच योग्य कार्य करते . भारतातील बांगलादेशी घुसखोरी विरोधात सरकारने कठोर पावले उचलावीत यासाठी अभाविपने किशनगंज येथे ” चलो चिकन नेक ” अशी हाक दिली व भारतीय सीमेचे सर्वेक्षण करून तत्कालीन महामहिम राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना सादर केले . काश्मिर येथील लाल चौकात अतिरेक्यांनी केलेल्या तिरंगा ध्वजाच्या अपमानाविरोधात
” जहाँ हुवा तिरंगे का अपमान , वही करेंगे उसका सम्मान ” असे ठासुन सांगणारी विद्यार्थी संघटना म्हणजे अभाविप । चलातर मग , आता निश्चय करूया तिरंगा फडकविण्यासाठी ध्वज संहिता पाळून त्या नियमानुसारच सन्मानाने ध्वजारोहण करूया
या अभियानात सहभागी होण्यासाठी व आपल्या गावात,
आपल्या घरात व अपल्या गल्लीत हे अभियान राबविण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा .
8668461733 / 9322265315