कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा मार्फत हेल्पलाईन सेवा सुरु

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा मार्फत हेल्पलाईन सेवा सुरु

गडचिरोली, दि.22: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयंम पोर्टलच्या विविध लाभार्थी घटक (स्टेक होल्डर्स) जसे उमेदवार/उद्योजक/नियोक्ते इ. यांना या संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावती करण करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्तपदास अनुसरुन ॲप्लाय करणे, राज्यातील युवक व विद्यार्थी यांना करिअर विषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यामध्ये इच्छूकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इ. विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यांत आलेल्या आहे. या ऑनलाईन सेवा घेतांना लाभार्थी घटकांना येणा-या अडचणी/तक्रारींची निराकारण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईनअंतर्गत दि.18.08.2023 पासून हेल्पलाईन सुरु करण्यांत येत आहे. या हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 18001208040 असा आहे. या हेल्पलाईनची वेळ सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत अशी आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.