भंडारा : लाखनी येथे चार कोटी रुपयाच्या  विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन 

लाखनी येथे चार कोटी रुपयाच्या 

विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन 

भंडारा,दि.9:-  लाखनी येथे 4 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. यात 2 कोटी रुपये किंमतीचे तलाव सौंदर्यीकरण व 2 कोटी रुपये किंमतीचे सभागृह बांधकामाचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला आमदार नाना पटोले, अभिजीत वंजारी यांचे सह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. जुनी बाजार समिती लाखनी येथे तलाव सौंदर्यीकरण व सार्वजनिक उद्यान विकसित करण्यासाठी 2 कोटी व नगरपंचायत क्षेत्रात सांस्कृतीक सभागृहाचे बांधकामासाठी 2 कोटी आमदार नाना पटोले यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले. या कामाचे भूमीपुजन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले.