पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर,दि.20: राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर  मुनगंटीवार  हे दि. 21 व 22 सप्टेंबर 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुल नगरपालिका अतंर्गत महसुल विभागाचे पट्टे वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4 वाजता लखमापूर मंदीर परीसरातील विविध सौंदर्य विकासकामाचे व पाण्याच्या टाकीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वाजता मेडीकल कॉलेज गणेश उत्सवाला भेट. त्यानंतर चंद्रपूर येथे मुक्काम.

शुक्रवार, दि.22 सप्टेंबर रोजी सायं. 4 वाजता पटवारी भवन, राजुरा येथे आयोजित कृषी सेवक मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वाजता चंद्रपूर येथील गणेश उत्सव मंडळाला भेट देतील. त्यानंतर चंद्रपूर येथे मुक्काम.