शिर्डी येथे महापशुधन एक्सपो-2023 चे आयोजन

शिर्डी येथे महापशुधन एक्सपो-2023 चे आयोजन

 

भंडारा दि.21: शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय व पशुपालन व्यवसायातून अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो. या उद्देशाने 24 ते 26 मार्च या कालावधीत शिर्डी (ता.राहता, जि.अहमदनगर) येथे राष्ट्रीयस्तरावरील पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केले आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी या पशुप्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

 

काल या महापशुधन एक्सपो बाबत प्रसिध्द केलेल्या भितीपत्रकाचे अनावरण जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वंजारी, जि.प पशुसंवर्धन अधिकारी सुबोध नंदागवळी, सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी आदी उपस्थीत होते.