नि:शुल्क स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर

नि:शुल्क स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर

भंडारा,दि.14: जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समिती, भंडारा यांचे नाविण्यपूर्ण योजनेतून युपीएससी, एमपीएससी, बँकींग व इतर अनुषंगिक स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, भंडारा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र 26 जून 2016 पासून सुरु करण्यात आलेले आहे. त्याअंतर्गत सोमवार 18 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
            नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरास सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, दिल्ली येथे नवनियुक्त असिसटंड कमांडंट (Assistant Commandant) सचिन येळणे (Exam.२०१९-Rank-१२) (ह.मु.मोहाडी जि.भंडारा) हे युपीएससी, एमपीएससी, बँकींग व इतर अनुषंगिक स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
            तरी युपीएससी, एमपीएससी, बँकींग व इतर अनुषंगिक स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचा नि:शुल्क लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे यांनी केले आहे.