सुक्ष्म पत पुरवठा योजने अंतर्गत चर्मोद्योग या व्यवसायासाठी लाभार्थ्यांला धनादेशाचे वाटप

सुक्ष्म पत पुरवठा योजने अंतर्गत चर्मोद्योग या व्यवसायासाठी लाभार्थ्यांला धनादेशाचे वाटप

गडचिरोली,दि.25: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय गडचिरोली, येथील (एनएसएफडीसी) राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सुक्ष्म पत पुरवठा योजने अंतर्गत चर्मोद्योग या व्यवसायासाठी रूपये ५०,०००/- ( पन्नास हजार चा धनादेश) दि.24.01.2024 रोजी पंकज तलमले, सहायक वित्त व लेखाधिकारी समाज कल्याण कार्यालय गडचिरोली यांच्या हस्ते महामंडळाचे लाभार्थी अमर किशोर म्हशाखेत्री, मु.पो. आष्टी, ता. चार्मोशी, जि. गडचिरोली यांना वितरीत करण्यात आला. या प्रसंगी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.टी. जिभकाटे व कर्मचारी अतुल कोटगले उपस्थित होते.