चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांचे संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.

आदिवासी विद्यार्थ्यांचे संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.

1.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका शाखा सिंदेवाहीच्या वतीने 10वी च्या परिक्षेत 90% टक्के गुण मिळणा-या विद्यार्थ्यास 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावे…..अनुसूचित जमातीतील 10 वी च्या परिक्षेत 90% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यवसायी उच्च शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या पुर्व तयारी करीता 10 वी 12 वी या वर्षात प्रत्येक 1-1 लाख रुपये प्रणाणे 2 लाख रुपये अनुदान देण्यात यावे. सदर योजनेला नाव आदिवासी समाजाचे रत्नदीप पुर्ण आयुष्य समस्त समाजाच्या सर्वांगीण विकासकरिता आपले राजकिय जिवन पणाला लावुन आदिवासीच्या कल्याणासाठी कार्य करणारे कै.बाबुरावजी मडावी, माजी राज्यमंत्री, राष्ट्रीय उपाध्यक्ष अ.भा.आदिवासी विकास परिषद दिल्ली यांच्या नावाने सुरु करण्यात यावे. या योजनेचा गरीब, गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकाचा व तळागाळातील कुटुंबातील गुंतवण विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडविण्यासाठी सर्व तोपरी मदत होइल या विषयाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. 2.दिनांक 7 जुलै 2017 चा सुप्रीम कोर्टाचा आदेशानुसार बोगस लोकांना काढुन आदिवासी समाजाच्या लोकांसाठी नौकरी भरती तत्काळ करावी. 3.सिंदेवाही तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी समाज बांधव आहेत. तसेच सिंदेवाही नगरात पण बहुसंख्येने आदिवासी समाज असल्यामुळे क्रांतिवीर भारतीय स्वातंत्र्याचे जनक बिरसा मुंडा स्मारकाकरिता 2 एकर जागा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात यावे. 4.मी एक स्वप्न पाहीला!……डॉ.राजेंद्र भारुड (आय.ए.एस.नंदुरबार जिल्हा अधिकारी) यांच्या जिवनाचे संघर्षमय प्रवास असलेले पुस्तक आदिवासी विद्यार्थ्यांस (मी एक स्वप्न पाहिलं!) समस्त महाराष्ट्रातील आश्रम शाळा,वसतिगृह, खाजगी महाविद्यालयातील प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यास मी एक स्वप्न पाहिलं! हे पुस्तक वितरण करण्यात यावे. 5.पडोन्नती आरक्षण देण्याबाबत (SC,ST,NT ईतर) 6.पेसा कायदा अंबलबजावणी संपुर्ण आदिवासी क्षेत्रात करावी. 7.आदिवासी बांबू कारागीर सिंदेवाही तालुक्यात उमरवाही,विसापुर,कळमगाव गन्ना, वासेरा,शिवणी ,खातेरा, किन्ही, सरडपार व ईतर गावातील समाज बांधव बांबू व्यवसाय करित आहेत त्यांना ओला बांबू नियमीत पुरवठा करण्यात यावे जेणेकरुन त्यांची उपासमार होणार नाही. ………..सदर निवेदनाकडे जातीने लक्ष वेधून तत्काळ सोडविण्यात यावे अशी मागणी केली आहे.
निवेदन देतांना उपस्थित तालुका अध्यक्ष विजयजी सोयाम ,महाराज रतनजी कोवे, रुपाताई सुरपाम जिल्हा परिषद सदस्य, मकरंद मडावी ,अशोक मसराम उपसरपंच, ताळदेव गावंडे सरडपार, दशरथजी मडावी, मंगलदास मेश्राम,गणेश मडावी, शरद नैताम, अविनाश आत्राम,मिलिंदजी तड़ोसे, कैलास कुंभरे जिल्हा संपर्क प्रमुख आदिवासी विकास परिषद चंद्रपुर. यांची उपस्थिती होती.