भंडारा : गोदाम बांधकाम व मिनी दाल मिल करिता अर्ज मागविले

गोदाम बांधकाम व मिनी दाल मिल करिता अर्ज मागविले

भंडारा, दि.23:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कडधान्य सन 2021-22 अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी या घटकामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यासाठी 250 मेट्रीक टन क्षमतेचे गोडाऊन बांधकामासाठी 50 टक्के जास्तीत जास्त रुपये 12.50 लाख अनुदान देय आहे. जिल्ह्यास 1 गोडाऊनचे लक्षांक प्राप्त आहे. तसेच शेतकरी गटाकरिता मिनी दाल मिल किंमतीच्या 60 टक्के अनुदान जास्तीत जास्त रुपये 1.25 लाखाचे मार्यादेत देय आहे. जिल्ह्याला दोन मिनी दाल मिलचे लक्षांक प्राप्त आहे. तरी गोदाम बांधकामासाठी इच्छूक शेतकरी उत्पादक कंपनी व मिनी दाल मिल करिता इच्छूक शेतकरी गटांनी त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र जोडून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा, बँक ऑफ बडोदाच्या वर, जेल रोड, राजीव गांधी चौक भंडारा कार्यालयाच्या पत्त्यावर 17 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.