नायब तहसिलदाराला रंगेहाथ अटक…

आलोसे श्री. किशोर प्रभाकरराव शेंडे वय ५१ वर्ष पद- नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय देवळी जि. वर्धा महसुल विभाग वर्ग-२ रा. वैष्णवी कॉमप्लेक्स न ३, फ्लॅट नं. १०६, कारला चौक, वर्धा यांनी ३,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारले वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा कडुन कार्यवाही.

तक्रारदार हे मास्टर कॉलनी, सावंगी मेघे जिल्हा वर्धा येथील रहीवासी असुन तक्रारदार यांचे वडिलोपार्जीत शेताचे आपसी वाटणीपत्र करणेकरीता आलोसे श्री. किशोर प्रभाकरराव शेंडे पद- निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय देवळी जि. वर्धा महसुल विभाग वर्ग-२ यांनी ५,०००/- रूपयाची लाच मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांची आलोसे यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा येथे दि. ०१/०८/२०२३ रोजी तक्रार नोंदविली.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाच मागणी संबंधाने दि. ०१/०८/२०२३ रोजी पडताळणी व दिनांक ०१/०८/२०२३ रोजी सापळा कार्यवाही करण्यात आली असता आलोसे श्री. किशोर प्रभाकरराव शेंडे वय ५१ वर्ष पद- निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय देवळी जि. वर्धा महसुल विभाग वर्ग-२ यांनी तक्रारदार यांचे वडीलोपार्जीत शेताचे दोघा भावांच्या नावाने आपसी वाटणी पत्र करून देणे करीता स्वत:चे आर्थीक लाभासाठी ३,०००/- रुपये लाच रक्कम निवासी नायब तहसिलदार यांचे दालन तहसिल कार्यालय देवळी येथे स्विकारुन ते रंगेहात मिळुन आले. यावरून त्यांचे कृत्य कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ (संशोधन अधिनियम सन- २०१८) अन्वये गुन्हा होत असल्याने त्यांचे विरुध्द पो.स्टे. देवळी जि.वर्धा येथे अप.क्र. / २३ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ (संशोधन अधिनियम सन – २०१८) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री सचिन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच श्री. अनामिका मिर्झापुरे, वाचक पोलीस निरीक्षक, लाप्रवि नागपूर, यांचे मार्गदर्शनात श्री. अभय आष्टेकर, पोलीस उपअधिक्षक, पोहवा. संतोष बावनकुळे, पोकॉ. कैलास वालदे, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे, चालक नापोशि निलेश महाजन सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी ईसम लाचेची मागणी करीत असल्यास कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

एसपी एसीबी नागपूर ७०४०२२२२२१

डीवायएसपी अभय अष्टेकर 8275088797

लँडलाइन क्रमांक ०७१२/२४३८४४

टोळी. क्र 1064

haharashtra.gov.n