आज 01 रुग्णाला डिस्चार्ज , कोरोना पॉझिटिव्ह 0

आज 01 रुग्णाला डिस्चार्ज

  • कोरोना पॉझिटिव्ह 00
  • एकूण डिस्चार्ज 58944
  • एकूण पॉझिटिव्ह 60083
  • क्रियाशील रुग्ण 06
  • आज 00 मृत्यू
  • एकूण मृत्यू 1133
  • रिकव्हरी रेट 98.10 टक्के
  • मृत्यू दर 01.89
  • आजच्या टेस्ट 499
  • एकूण टेस्ट 449485

भंडारा,दि.31 :- जिल्ह्यात आज एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली नसून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 01 आहे. आज 499 व्यक्तींची चाचणी केली असता 00 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्ह्यात आता 06 सक्रिय रुग्ण आहेत.

आज 01 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58944 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60083 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 49 हजार 485 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60083 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58944 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60083 झाली असून 06 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोरोनावर  सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
  • जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
  • सध्या सणासुदीचे दिवस आहेत आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.