चंद्रपूर : कौशल्य विकासातून, रोजगार व समाजसेवेची संधी – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

कौशल्य विकासातून, रोजगार व समाजसेवेची संधी

 अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

Ø जागतिक युवा कौशल्य दिन

चंद्रपूर दिनांक 16 जुलै: मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत युवकांना कौशल्य विकासातून रोजगार व समाजसेवची संधी प्राप्त झाल्याची माहिती जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, यांनी दिली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर येथे जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, अधिष्ठाता  डॉ. अविनाश टेकाडे उपस्थित होते.

कोविड-19च्या काळात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रामध्ये 1. Phlebotomist 2. Yoga Welness Trainer अभ्यासक्रमामध्ये 48 उमेदवारांना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये दिली.

तर अधिष्ठाता  डॉ.अविनाश टेकाडे यांनी उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तंत्रशुध्द सोईसुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर, ब्रम्हपुरी रुग्णालय व संशोधन संस्था, ब्रम्हपुरी व  संजिवनी ऑर्थोपेडीक आणि फ्रेंक्चर हॉस्पीटल, तुकुम चंद्रपूर या व्यावसायीक प्रशिक्षण संस्थेचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जागतीक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यालयातर्फे विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेची ऑनलाईन माहिती देण्याकरीता वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ तसेच उद्योमीता प्रकल्पाबाबत समन्वयक अमरीन पठाण, सहायक लोमेश भोयर, प्रभारी जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी भगत, मृनाली पिंपळकर यांनी उमेदवारांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

तर कार्यक्रमाचे संचालन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत तर आभार जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मुकेश मुंजनकर यांनी मानले.