गडचिरोली : गोरगरिबांचे समस्या मार्गी लागाव्यात हेच ध्येय – शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन

गोरगरिबांचे समस्या मार्गी लागाव्यात हेच ध्येय – शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

सिरोंचा :- गोरगरीब व सर्वसामान्यांचे प्रश्न व समस्या मार्गी लागावे हेच आमचे ध्येय असून त्यासाठीच शिवसंपर्क अभियान राबविले जात असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी केले आहे.
ते गुरुवार २२ जुलै रोजी स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आढावा बैठकीत प्रामुख्याने सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप, जिल्हा प्रमुख रियाज शेख, उपजिल्हाप्रमुख अरुण धुर्वे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका करुणा जोशी, ज्येष्ठ शिवसैनिक विलास ठोंमरे, तालुका संघटक दुर्गेश तोकला, ऊज्वल तिवारी, बिरजू गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलतांना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने पक्षाचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शोषित, पीडित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, दुर्गम व जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे समस्या जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान १२ जुलैपासून राबविण्याचे संकल्प केले असून, अभियान दरम्यान गावातील व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी अजून यावर ‘जालीम उपाय’ म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ व वरिष्ठ नेते ना.एकनाथरावजी शिंदे यांचे जिल्ह्यात विधानसभा निहाय दौरा करून नागरिकांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप आणि जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी शिवसंपर्क अभियान मोहिमेचा सिरोंचात हा दुसरा टप्पा असून, शिवसैनिकांनी प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेटी देऊन ‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ तयार करून पक्ष विस्तारासाठी पक्षाची मजबूत बांधणी व गाव कोरोना मुक्तीसाठी गावकरी व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे यांनी तर सूत्रसंचालन तालुका प्रमुख अमित तिपट्टीवार यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक रघु जाडी, सत्यनारायण दसर्ती, तुषार येन्डे, केशव नास्कुरी, नागराज गोरला, रुपेश नसापुरी, रुपेश नुकूम, वेणू कोतवडला, राजे भीमकरी, मधुकर इंगली आदी शिवसैनिक आणि शहर प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख उपस्थित होते.