गडचिरोली : शिवसंपर्क अभियानात भांमरागड येथे नागरिकांनी मांडल्या अनेक व्यथा!

शिवसंपर्क अभियानात भांमरागड येथे नागरिकांनी मांडल्या अनेक व्यथा!

जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांनी ‘दखल’ घेण्याचे दिले आश्वासन

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

भामरागड :- शिवसेना पक्षाचे गत १२ जुलै पासून राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान सुरू असून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रत्येक तालुका व प्रमुख गावात जाऊन नागरिकांचे भेटी गाठी व समस्या जाणून घेत आहेत.
शिवसंपर्क अभियाना अंतर्गत सोमवार २२ जुलै रोजी शिवसंपर्क अभियानाच्या मोहिमेत भामरागड येथे ग्रामसभा तथा वनहक्क समितीने पर्यावरणाला धोका व अतिक्रमणाची प्रशासनाकडून पाठराखण होत असल्याची व वेळेप्रसंगी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत असल्याची ‘व्यथा’ मांडले. यावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी ‘दखल’ घेऊन सदर समस्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याकडे लावून धरणार असल्याचे आश्वासन दिले. आणि पर्यावरण हे जिव्हाळ्याचे विषय असल्याने पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडेही या गंभीर विषयाकडे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.
निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून शासनाने २००५ पासून अतिक्रमणावर बंदी घातली आहे. मात्र या नियमाला धाब्यावर ठेऊन येथील स्थानिक प्रशासन व प्रभारी तहसीलदार अनमोल कांबळे अतिक्रमण धारकांचे पाठराखण करीत आहे, त्यामुळे त्यांना भामरागड येथून तात्काळ हटविण्याची तीव्र व एकमुखी मागणी ग्रामसभा तथा वनहक्क सनियंत्रण समिती व भामरागड येथील नागरिकांनी शिवसंपर्क अभियानादरम्यान शिवसैनिकांना निवेदन देऊन केले.
निवेदनात नमूद केले आहे की, कोणतेही परवानगी व ठराव न घेता बाहेरील नागरिक भामरागड येथे येऊन जंगल तोडून वास्तव्य करीत आहेत, वृक्ष व जंगल तोडीमुळे पर्यावरण व पर्यायाने शासनाचेही नुकसान होत आहे, मात्र स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून उलट अतिक्रमण धारकांचेच पाठराखन करीत असल्याने नाराजी व संताप व्यक्त केले आहे.
उभ्या जंगलाचा ऱ्हास व जंगल तोडीमुळे पर्यावरणाचा नुकसान होत असल्याने नायब तहसीलदार तथा प्रभारी तहसीलदार अनमोल कांबळे यांच्यावर कार्यवाही करून तात्काळ भामरागड येथून हटविण्यात यावे व पूर्णवेळ तहसीलदार देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख रियाज शेख यांना देण्यात आले.
मागणीचे दखल घेऊन अहेरी विधानसभा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी, सदरची मागणी व संतापाची लाट जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे व वरिष्ठांकडे लावून धरणार असल्याचे आश्वासन देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आशावाद यावेळी रियाज शेख यांनी बोलून दाखविले.