गडचिरोली : येलचिल रोडवर धानाचा भुसा घेऊन जाणारी ट्रक पलटली अपघातात एक ठार तर तीन जखमी

येलचिल रोडवर धानाचा भुसा घेऊन जाणारी ट्रक पलटली

अपघातात एक ठार तर तीन जखमी

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

अहेरी:- एटापल्ली वरून धानाचा भुसा घेऊन येणारी ट्रक (MH 31, CB 6681) पलटले असून मंगळवार दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास येलचिल पहाडीजवळच्या वळणार अपघात झाला. अपघातात ट्रक चालक नवनात शेंडे (38)जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत.
जखमीत अनिल बावणे (50), मोरेश्वर कावळे (45), प्रकाश मंदाडे (45) यांचा समावेश असून हे सर्व व मृतक ट्रक चालक चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सिमडा येथील रहीवासी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आलापल्ली येथील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे यांनी स्वतःच्या चारचाकी गाडी घेऊन लगेच घटनास्थळ गाठले व जखमींना तात्काळ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख व आलापल्ली येथील टायगर गृपचे आदर्श केसलवार, अशोक मद्देर्लावार, मल्लेश आलाम, हसन खान व अहेरी येथील सुरेंद्र अलोने, शैलेश पटवर्धन, बिरजू गेडाम यांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींना मदत केले.