भंडारा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्या  –  हिंदुराव चव्हाण

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्या  –        हिंदुराव चव्हाण

भंडारा,दि.14:- प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीपसन 2021-22 राबविण्यास शासनाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहेभंडारा जिल्ह्याकरिता या योजनेअंतर्गत भात व सोयाबिन ही दोन अधिसूचित पिके आहेतनुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरण्यात येईल. योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसानपीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आगवीज कोसळणेगारपीटवादळचक्रीवादळपुरक्षेत्र जलमय होणेभुस्खलनदुष्काळपावसातील खंड ईबाबीमुळे उत्पादनात येणारी घट बाबीकरिता नुकसान भरपाई देण्यात येते.

सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहेबिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहेसदर अर्ज बँककृषी पतपुरवठा सहकारी संस्थाप्रादेशिक ग्रामीण बँकआपले सरकार सेवा केंद्र किंवा विमा कंपनीचे अ‍धिकृत विमा प्रतिनिधी यांचेमार्फत विमा हप्ता भरावयाचा आहे. बिगरकर्जदारासाठी अर्जाची अंतिम मुदत 15 जुलै 2021 आहे.

 प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीपसन 2021-22 अंतर्गत धान व सोयाबिन दोन्ही पिकांसाठी जोखिमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आलेला आहेपिक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा अंतिम दिनांक 15 जुलै 2021 आहेभंडारा जिल्ह्याकरीता एचडीएफसी इर्गो इन्सुरंस क.लिमुंबई ही इन्सुरंस कंपनी निश्चित झालेली आहेपीक विमा योजनेअंतर्गत धान पीक (खरीप हंगामकरिता शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्त्याची रक्कम रु.760/- प्रति हेक्टर असुन विमा संरक्षित रक्कम रु38000 प्रति हेआहेतसेच सोयाबिन पीक (खरीप हंगामकरिता विमा हप्त्याची रक्कम रु550 प्रति हेक्टर असुन विमा संरक्षित रक्कम रु27500 प्रति हेआहे.

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्रपिकेविमा हप्ता व योजनेच्या ईतर तपशिलाकरिता क्रॉप इंशुरन्स हे मोबाईल अॅप शेतकऱ्यांकरिता मराठी भाषेमध्ये विकसित करण्यात आलेले आहेया अॅप च्या माध्यमातुन योजनेबाबत माहिती वेळोवळी शेतकऱ्यांना  पाहता येईल. तरीप्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीपसन 2021-22 योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी खूप कमी कालावधी उरला असून त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्याबाबतजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा हिंदुराव चव्हाण यांनी आवाहन केले आहे.