घोटाळेबाज ‘डीएचएफएल’ची भाजपला २८ कोटींची देणगी-हेमंत पाटील

घोटाळेबाज ‘डीएचएफएल’ची भाजपला २८ कोटींची देणगी-हेमंत पाटील

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा ४२ हजार कोटींचा घोटाळा

मुंबई।

देशातील विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करते.ईडी भाजपच्या हातचे बाहुले बनले आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या राजकीय नाट्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात ईडीने महत्वाची भूमिका बजावली.राजकीय अस्त्राप्रमाणे भाजप या यंत्रणेचा वापर करतेय.पंरतु, देशाचे २० हजार कोटी रुपये लुटून नीरव मोदी,मेहुल चोकसी पसार झाले तेव्हा ईडी कुठे होती, असा सवाल इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. ललीत मोदीने २८०० कोटी, विजय माल्या १० हजार कोटी, नितीन संदसरा ६ हजार कोटी लुटून पसार झाले आहेत. पंरतु, ईडीने त्यांच्याबाबत कुठलीही कारवाई केलेली नाही.

देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा डीएचएफएल कंपनीने केला आहे. या कंपनीने ४२ हजार कोटींचा घोटाळा केला आहे.बॅक ऑफ बडोदा कडून १,९५९, बॅक ऑफ इंडिया ४,७५० कोटी, बॅक ऑफ महाराष्ट्र १,१७० कोटी, कॅनरा बॅंक ५,६५०, सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया १,०३४, फेडरल बॅंक ३००, एचडीएफसी ३५०, आयडीबीआय १,८०६, इंडियन बॅंक २,१५०, इंडियन ओवरसिज बॅंक ९२० , कर्नाटक बॅक २००, पंजाब अँड सिंध बॅंक १,३८५, पंजाब नॅशनल बॅंक ३,८०२,साउथ इंडियन बॅंकेकडून ३३२ ,स्टेट बॅंक ऑफ इंडिया ९,८९८, युको बॅंक ५००, युनियन बॅंकेचे ६,६६२ कोटी रुपये घेतले आहेत,असा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे.

या बॅंकांमध्ये मजुर, शेतकरी, नोकदार, छोटे व्यापारी, श्रमिकांचा पैसा जमा आहे. पंरतु, बॅंकेतील पैसे खाली केले जात आहे.सर्वसमान्यांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे. भाजपला डीएचएफएलने २७ कोटींचा निधी दिला आहे. ऐरवी छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये सक्रिय भूमिका दाखवणारी ईडी या प्रकरणाची दखल का घेत नाही? असा सवाल उपस्थित करीत सीबीआय,पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत तपास सुरू करावा. भाजप आणि डीएचएफल मधील आर्थिक व्यवहाराची देखील चौकशी केली जावी, अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे.