19 जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

19 जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि.9 जुलै: शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर  महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा लोकशाही दिन सोमवार दि. 19 जुलै 2021 रोजी जिल्हा‍धिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित केलेला आहे.

महिला लोकशाही  दिनी न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, अशी  प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही. ज्या महिलांच्या वरील बाबी सोडून तक्रारी, निवेदने वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापुर्वीच विहित नमुन्यात दोन प्रतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे स्वीकारण्यात येईल.

तसेच सदर महिला लोकशाही दिनामध्ये जिल्हास्तरीय तक्रार अर्ज व तालुकास्तरांवरील अपिलीय अर्ज स्वीकारण्यात येतील.असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.