सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत येथे माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम

सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत येथे माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम

सिंदेवाही :- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमबाबत राज्य शासनाच्या निर्देशानुसार सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत वतीने मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री स्वप्निल योगराज कावळे, नगराध्यक्ष सिंदेवाही लोनवाही, प्रमुख्य उपपस्थिती मा. श्री राहुल दि. कंकाळ, मुख्याधिकारी, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत, मा. श्री मयूर रमेश सुचक, उपाध्यक्ष, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत, मा. श्री पंकज प्रभुदास नन्नेवार, सभापती सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती, मा. श्रीमती मिनाक्षी संजय मेश्राम, सभापती महिला व बालकल्याण समिती, मा. सौ. पुजा विलास रामटेके, उपसभापती महिला व बालकल्याण समिती तसेच नगरसेवक श्री दिलीप भिवाजी रामटेके, श्री शाम परमानंद छत्रवाणी, श्री अमृत भास्कर मडावी, श्री युनूस हबीब शेख, सौ. अंजू नरेंद्र भैसारे, सौ. निता भगवान रणदिवे, सौ. श्वेता संजय मोहुर्ले, सौ. वैशाली संजय पुपरेड्डीवार यांचे प्रमुख उपस्थितीत पंच प्रण ( शपथ) घेण्यात आले. सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत क्षेत्रातील स्वातंत्रसैनिक, विरांना वंदन कार्यक्रम ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या निवृत्त स्वातंत्र्यसैनिक व त्याचे परिवारातील सदस्य श्री अतुलकुमार वसंतराव देशमुख, श्री राहुल बाबुलाल डांगे, श्री सुरेश निकोडे, श्री विलास बुधाजी चौधरी, श्री जनार्धन रामाजी चिमलवार, व मंथनकुमार लोध, संभाजी साखरे, बाबुराव कोडापे, राजेश खोब्रागडे, रामाजी निकोडे नानाजी बेले यांचे परिवातील सदस्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान सोहळा करण्यात आले. त्यांनतर मौजा आंबोली येथील घनकचरा प्रकल्प जागेवर वसुदा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपाची लागवड करुन अमृत वाटीका करण्यात आली.
सदर कार्यक्रमास सिंदेवाही-लोनवाही शहरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक श्री युनूस शेख यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री राहुल कंकाळ यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यास श्री सुरज गायकवाड, श्री विनोद काटकर, श्री सुधिर ठाकरे, श्री संदीप कांबळे, श्री संजय वाकडे, श्री संजय रामटेके, श्री नंदू सरवरे, चेतन राऊत आणि सर्व नगरपंचायत अधिकारी / कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.