जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

भंडारा, दि. 30 : 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या एड्स दिनाचे घोषवाक्य Equalize (आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्याकरिता) आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा सामान्य रुग्णायल येथे रॅली, कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रॅलीची सुरुवात सामान्य रुग्णालय-मोठा बाजार-पोस्ट ऑफिस चौक-बसस्टॉप ते जिल्हा रुग्णालय येथे सांगता होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींकरिता पोस्टर्स-रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही बाबत युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील आयसीटीसी समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचेव्दारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींकरिता एड्स, क्षयरोग, एसटीआय/आरटीआय, ए.आर. टी. औषधोपचार या विषयावर मार्गदर्शन तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.