ब्रिडींग चेकर्स मोहीमेद्वारे डेंग्युस प्रतिबंध

ब्रिडींग चेकर्स मोहीमेद्वारे डेंग्युस प्रतिबंध

चंद्रपूर ८ सप्टेंबर – डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहे.योजनाबद्ध रीतीने कार्य केल्याने डेंग्युला आला बसला आहे. मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्युचे २६५ रुग्ण मनपा हद्दीत आढळुन आले होते.

यंदा आयुक्त श्री.राजेश मोहीते व अतिरिक्त आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात संपुर्ण आरोग्य टीम पावसाळ्याच्या २ महीने आधीच कार्यरत झाली. आरोग्य विभागामार्फत डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला गेला,मागील वर्षी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते ते व संभाव्य दुषित घरे ओळखुन त्यांवर विशेष लक्ष ठेवले गेले. नागरिकांना आपल्या घरी गप्पी मासे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. २५ ब्रिडींग चेकर्स, ३५ एएनएम, ७ एमपीडब्लु व १२८ आशा वर्कर, स्वच्छता निरीक्षक यांनी घरोघरी भेट देऊन कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी इत्यादी डासोत्पत्ती स्थाने अबेट द्रावणाद्वारे नष्ट केली व ही मोहीम सातत्याने सुरु आहे.

सर्व शाळांना दिल्या गेलेल्या स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्डद्वारे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचे उगमस्थान व रोगापासुन आपला बचाव कसा करावा हे कळले. आता शाळकरी मुले आपल्या घरी डेंग्युविषयी जागृती करत आहेत व मनपाच्या मोहीमेस सहकार्य करत आहे. डेंग्यु प्रतिबंध मोहीमेत २९ संशयित डेंग्यु रुग्ण आरोग्य विभागास आढळले होते यातील ६ रुग्ण एलीसा चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत, सदर रुग्ण तुकूम, इंदिरानगर, घुटकाळा, टीचर्स कॉलोनी व दादमहाल वॉर्ड परिसरातील असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या उत्सव, सणांचे दिवस असल्याने नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे व डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे