तालुक्यात 22 ते 26 मे या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

तालुक्यात 22 ते 26 मे या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन

 

भंडारा, दि. 22 मे : जिल्हातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमात प्रशासकीय यंत्रणेला सहभागी करुन तालुका स्तरावर दिनांक 22 ते 26 मे 2023 या कालावधीत प्रत्येक तहसील कार्यालयाच्या अंतर्गत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेत.

 

महिलांनी त्यांचे वैयक्तीक तक्रारी असल्यास सदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरात खालील दिनांक, वेळ व ठिकाणी तक्रारीसह उपस्थित राहावे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी कळविले आहे.

 

अ.क्र

 

तालुक्याचे नाव

 

दिनांक

 

ठिकाण

 

शिबीराची वेळ

 

1

 

तुमसर

 

22.05.2023

 

तहसील कार्यालय, तुमसर.

 

सकाळी 9.30 ते 11.30

 

2

 

मोहाडी

 

23.05.2023

 

तहसील कार्यालय (नविन इमारत), मोहाडी

 

सकाळी 9.30 ते 11.30

 

3

 

लाखनी

 

24.05.2023

 

स्वागत लॉन, लाखनी

 

सकाळी 9.30 ते 11.30

 

4

 

साकोली

 

25.05.2023

 

तहसील कार्यालय, साकोली

 

सकाळी 9.30 ते 11.30

 

5

 

भंडारा

 

22.05.2023

 

बचत भवन तहसील कार्यालय,भंडारा

 

सकाळी 9.30 ते 11.30

 

6

 

पवनी

 

24.05.2023

 

पंचायत समिती सभागृह, पवनी

 

सकाळी 9.30 ते 11.30

 

7

 

लाखांदूर

 

26.05.2023

 

तहसील कार्यालय, लाखांदुर

 

सकाळी 9.30 ते 11.30