26 जुलै रोजी कारगील विजय दिवस व माजी सैनिक मेळावा

26 जुलै रोजी कारगील विजय दिवस व माजी सैनिक मेळावा

चंद्रपूर, दि. 25 :  माजी सैनिक कल्याण बहुद्देशीय संस्था व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जुलै 2023 ला सकाळी 10 वाजता कारगील विजय दिवस व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनोजे कुणबी समाज मंदीर, लक्ष्मी नगर, वडगाव, चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विनय गौडा तर उद्घाटक म्हणून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे उपस्थित राहतील.