जलनगर येथे नविन हनुमान मंदीरालगत शिवलींग प्राणप्रतिष्ठा  

0

जलनगर येथे नविन हनुमान मंदीरालगत शिवलींग प्राणप्रतिष्ठा  

चंद्रपूर (का.प्र).

स्थानिय जलनगर वार्ड येथे जन्माष्टमी चे औचित्य साधुन एक एक सर्वांगसुंदर स्फटीक शिवलींग व नंदी विग्रहाची

प्राणप्रतिष्ठा नुकतीच करण्यात आली .

सविस्तर असे कि, जलनगर निवासी भा.ज.पा चे महानगर सचिव समाजसेवी राकेशभाऊ बोमनवार यांच्या संकल्पनेतून

व कॅबीनेट मंत्री श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष सहकार्याने जलनगर स्थित नविन मारुती मंदीरा लगत• शिवलींग स्थापना कार्यक्रम दिवसभर संपूर्ण

नागरिकांनी सहकार्य देऊन साजरा केला. सकाळी ८ वाजेपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली शिवलींग व नंदी विग्रहांची षोडशोपचार व मंत्र

जापाने जलाभिषेक, दुग्धाभिषेक, सोपास्कार पार पडत असतांना श्री/श्रीमती राकेश बोमनवार, श्री/श्रीमती नरेश गटलेवार श्री/श्रीमती संजय दर्शनवार श्री/श्रीमती बालाजी चावरे या युगलांनी यजमानपद भुषविले. होमहवन कार्यक्रम दुपारच्या सत्रात पार पाडण्यात आले. श्री. चौबे महाराज यांचे मार्गदर्शनात

गायत्री संस्था कार्यकर्ता ज्योती शिंगेवार, श्रीमती कुसूम मेश्राम, काजल लांडगे, शोभाताई गटलेवार , गणेश झाडे, प्रकाश परमार ,बापू नागपूरे

रणजित कंजर, तुषार वरखडे संतोष झा कमला देवी मिश्रा व वार्डातील समस्त नागरीक शेकडोच्या संख्येने सामील होते. रात्रोला शेकडो नागरिकांसह आमंत्रीत

पाहुणे ब्रिझभुषण पाझारे व सुभाष कासनगोट्टूवार यांनी भाविकासह आरती ओवाळून व पुजन करून महाप्रसाद ग्रहण केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here