भर पावसात बल्लारपूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

भर पावसात बल्लारपूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बल्लारपूर शहरामध्ये पायदळ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी पाटील, तहसीलदार डॉ.कांचन जगताप, संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे, पोलिस निरीक्षक उमेश पाटील, उपविभागीय अभियंता एन.पी.मुत्यलवार, शाखा अभियंता श्री. जोशी यांचे हस्ते वृक्षारोपन करुन रॅलीची सुरुवात करण्यात आली.

सदर रॅलीची सुरवात नगर परिषद ते गोलपुलीय मार्गाने गेल्यानंतर सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला माल्यार्पन व राष्ट्रगीताचे गायन करून झाली. या रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस विभाग, बांधकाम विभाग, कोषागार कार्यालय, आरोग्य विभाग, रोटरी क्लब, कच्छ कडवा पाटीदार युवा मंडळ, लोकमत सखी मंच, रास्त भाव दुकानदार संघटना, गुरुनानक प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, विविध राजकीय पक्ष व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शहरातील स्थानिक नागरीक यांचा सहभाग होता.

सदर रॅलीमध्ये तहसीलद कार्यालयातील निकीता रामटेके यांनी भारतमातेचा वेश परिधान करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी बल्लारपूर तालुक्यातील पुरातत्वदृष्टया महत्‍वाचे ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या बल्लारपूर येथील किल्यास भेट दिली व अमृत महोत्सवानिमीत्त इतिहासाचे स्मरण करण्यात आले.