धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर दिनांक 9 सप्टेंबर : पणन हंगाम 2021-22 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून धान खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. नोंदणी करण्याचा कालावधी 3 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत निर्धारित करण्यात आला आहे.
त्यानुसार सदर हंगामातील धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दि. 30 सप्टेंबर अखेर आपल्या नजीकच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शेतीचा 7/12, बँक खाते पासबुक इत्यादी संपूर्ण कागदपत्र आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.