‘अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धा सन 2022-23’ Ø शासकीय कार्यालयात कार्यरत खेळाडू कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

‘अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धा सन 2022-23’ Ø शासकीय कार्यालयात कार्यरत खेळाडू कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 14 जून : केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारातील “अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा” दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा राज्य शासनाच्यावतीने त्या-त्या राज्यांमध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धांसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्पर्धेसाठी पाठवायचा आहे.

राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या खेळाडू कर्मचाऱ्यांना टेबलटेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रिज, कॅरम, बुद्धिबळ, अथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पावरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत या खेळ प्रकारात ज्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथून प्राप्त करून घ्यावा. तसेच कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुखांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत दोन प्रतींमध्ये (प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे) या कार्यालयात दि. 20 जुलै 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.