” बुद्ध जयंती हर्षोल्लासात सम्पन्न”

  ” बुद्ध जयंती हर्षोल्लासात सम्पन्न”

” जगाला युद्ध नाही तर फक्त बुद्धाचे विचारच तारू शकतात, आज जग बारूतिच्या ढिगारयावर उभे आहे , जरा कुठे ठिनगी लागली अन जग सम्पूर्ण जळून खाक झाले अशी घातक अवस्था आपल्या पृथ्वीची झालेली आहे,मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न जनु आ वाचून उभा असल्याचे आपल्याला दिसत आहे.मागील एक वर्षापासून रशिया आणि यूक्रेन चे युद्ध सतत चालू आहे , या युद्धात लाखो सैनिक, स्त्रीया , पुरुष, आणि अनेक बालकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. लाखो लोकांचा बळी घेऊन सुद्धा दोन्ही देशाचे शासक कुठे ही थांबायला तयार नाहीत , एकीकडे गौतम बुद्धान्नी नदीच्या पाण्याच्या वापराच्या अधिकारा वरुन युद्धच्या उम्बरठयाशी आलेले शाक्य व कोलियांना युद्ध करन्यापासुन परावृत्त केले, त्यासाठी बुद्धान्नी स्वतः घराचा त्याग केला व हजारो लोकांना जीवनदान दिले, इतके भक्कम उदाहरण असतांना देखील रशिया आणि यूक्रेन हे दोन्ही देश बुद्धा चा मार्ग स्वीकारत नाही आणि याच देशांनी जगाला अणुयुद्ध तसेच तिसऱ्या महायुद्धाच्या स्थितीत आणले आहे. या युद्धच्या परिणामाचा जरा अभ्यास करून बुद्धाच्या शांति अहिंसा,प्रेम, मानवतेचा मार्गाचा अवलंब करावा याशिवाय काही तरणोपाय नाही.” असे विचार बुद्ध जयंती च्या कार्यक्रमात समितीचे सचिव एम आर राउत यांनी व्यक्त केले.

त्रिमूर्ति चौक भंडारा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब अम्बेडकर स्मारक समिति तर्फे बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर भगवान गौतम बुद्धाची 2556 वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेची दिप, धूप, पुष्प द्वारे पूजा करण्यात आली. बुद्धवन्दने नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाला असित बागड़े यशवंत नंदेश्वर, सूर्यभान हुमने, युवराज कोचे, राजेन्द्र काळे, रमेश जांगड़े, भीमराव बंसोड़, माधवी बंसोड़, नैना बागड़े, तसेच भंडारा शहरातील गणमान्य व्यक्तिन्ची उपस्थिति होती.