राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांचा भंडारा जिल्हा दौरा

राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांचा भंडारा जिल्हा दौरा

भंडारा, दि. 3 : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू 4 जून 2022 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.

दुपारी 2 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने तिरोडा जि. गोंदिया कडे प्रयाण करतील.