राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज पाठवावे

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज पाठवावे

भंडारा, दि. 3 : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सहसचिव, भारत सरकार, शिक्षा मंत्रालय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्याद्वारे सन 2022 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 1 जून 2022 पासून नावनोंदणी सुरु झालली आहे. इच्छुक शिक्षकांनी 20 जून पर्यंत पुरस्कारासाठी ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर यांनी कळवले आहे. अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या कार्यालयात 07184-253263 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क